युवा मतदार शहराच्या विकासाचा भागीदार.मा. वैशालीताई सुर्यवंशी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन..!

पाचोरा – येथिल एम.एम.कॉलेज पाचोरा येथे आयोजित “चाय पे चर्चा – युवा मतदार : शहराच्या विकासाचा भागीदार” या प्रेरणादायी युवा संवाद कार्यक्रमात भाजप नेत्या मा. वैशालीताई सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन दिले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगलेल्या या संवादात वैशालीताईंनी सांगितले की, “युवक हे केवळ मतदार नाहीत, तर राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार आहेत; त्यांच्या प्रत्येक विचारातून, निर्णयातून आणि मतदानातूनच शहराच्या विकासाची दिशा ठरते.” शहराच्या परिवर्तनाची सुरुवात तरुणांच्या जागरूकतेतूनच होते, असे सांगत वैशालीताईंनी विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून समाजघडणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास मधुभाऊ काटे, सौ. सुचेता ताई वाघ, गणेश पाटील, गोविंद शेलार, दीपक माने आणि ओम बोरसे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



