भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिन समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
जळगाव, दि 11 – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्ताने जिल्हास्तरीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 15 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 9.05 वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता ध्वजारोहण समारंभास सर्वांसाठी मास्क लावणे आणि सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377