निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित विद्यार्थ्यांचा कला गुणांचा आविष्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न
निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान तर्फे होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी निःस्वार्थ क्लासेस चालविले जाते , या निःस्वार्थ क्लासेस अंतर्गत विद्यार्थ्याना आधुनिक शिक्षणाचे धड़े दिले जातात याच होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांचे कला गुण सादरिकरणासाठी ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित विद्यार्थ्यांचा कला गुणांचा आविष्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.रंजना ताई पाटिल होते तर प्रमुख अतिथि स्थानी श्री.विजय सोनवणे सर , पंकज व्यवहारे सर , श्रीपाद मराठे , प्रल्हाद जी जावळे,प्रभुदास जावळे,भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष अनिल बाविस्कर, जळगाव शहर पोलिस श्री.प्रणेश ठाकुर, अनिल वाणी,माजी क्रीड़ा अधिकारी किरण जावळे, आदि उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान च्या समाजसेवी कार्याची माहिती प्रास्ताविकेतुन धीरज जावळे सर यांनी मांडली यानंतर निःस्वार्थ क्लासेस च्या आरती पाटिल, स्वामी गोयर,पूनम हिवकर,वैष्णवी जैसवाल या विद्यार्थ्यानी स्वातंत्र्य दिनांचे महत्व आपल्या विद्यार्थी मनोगतातून व्यक्त केले, भारत मातेच्या सुरक्षितेसाठी ज्या शुरविरानी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याची आठवण म्हणून निःस्वार्थ क्लासेस च्या देवराज घेंगट,मोहित जावळे,मोहित घेंगट,जयेश सोनवणे,मयूर कोळी,उमेश चौधरी,तेजस पिंगळे, या विद्यार्थ्यानी शहीद शूरवीरांवर लक्षणीय नाटक सादरिकरण करून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रु आणले व उपस्थित मान्यवर व प्रेक्षका ची दाद मिळवली यात निःस्वार्थ क्लासेस च्या मुलीच्या डान्स ग्रुप ने कार्यक्रमात जल्लोष व उत्साह निर्माण केला यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले .
यानंतर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण भारताची ग्रेट मैथमैटिशियन शकुंतला देवी यांच्या स्वरुपात निःस्वार्थ क्लासेस ची 12 वर्षाची विद्यार्थिनी कु.नेहा तेजी व देवेंद्र जावळे या दोन विद्यार्थ्यानी ७० पर्यंत चे घन उपस्थित स्पष्टीकरण व सादरिकरण केले .
उपस्थित मान्यवरानी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या या लक्षवेधक व आकर्षक कलागुणांचे कौतुक केले व त्याचबरोबर भविष्यात या विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्याचे ग्वाही ही दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धीरज जावळे सर , नकुल सोनवणे ,गणेश देसले, सतीश जावळे, सुल्तान पटेल,पूनम ताड़े, खुशी सोनवणे यांनी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठान चे अध्यक्ष व निःस्वार्थ क्लासेस चे प्रशिक्षक श्री.अविनाश किरण जावळे सर व आभार प्रदर्शन सचिव सौ.शारदा सोनवणे यांनी सादर केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377