एरंडोल ,कासोदा दि ५ – पोलीस खाते म्हटले की कायदा व सुव्यवस्था राखणे साठी कार्यरत असलेली शासकीय यंत्रणा जी दिवस रात्र आपले कार्य करीत असते.समाजात या खाते विषयी आदर तर नक्कीच आहे शिवाय कायद्या विरोधात घडणाऱ्या घटनांना/गुन्हेनां आळा घालणे ,सामाजीक शांतता/ सलोखा प्रस्थापीत करणे ,आदी कामे पोलीसांन मार्फत होत असतात दिवसरात्र येणारे तक्रारी ,त्यांचे निवारण ,दैनंदिन घडणाऱ्या विविध अपराधीक घटना आदींनी या खात्यावर ताण पडतो, याचा मानवी स्वभाव व प्रकृतीवर होणाऱ्या परिणामांकडे नक्कीच दूर्लक्ष करता येणार नाही .असे असताना आपले सामाजीक दायित्व समजून जर समाजाला दिशा देणारे व भावी पिढी घडविणारे राष्ट्रकार्यात सदैव तत्परतेने कार्यरत असणारे शिक्षणाचा प्रसार व ज्ञानार्जन करणारे गुरू यांचा उचित सन्मान करणे ही क्रमप्राप्त ठरते
गुरूदिनी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी हे कर्तव्य पार पाडणे साठी एक महिला अधिकारी पुढाकार घेते ही बाब फक्त उल्लेखनीय नसून तर तो समजा पुढे एक आदर्श निर्माण झाला आहे असे समाजाभिमुख, संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ अधिकारी जर असतील तर नक्कीच समाजासोबत राष्ट्राची प्रगती झाल्याखेरीज राहणार नाही
स पो नि. निता कायटे आपले मनोगत व्यक्त करताना लिहतात
शिक्षक दिन
शाळांमध्ये तर हा दिवस म्हणजे खास सेलिब्रेशनच असते. विद्यार्थी शिक्षक होतात आणि प्रत्यक्ष वर्गात शिकवतातही. मग यादरम्यान झालेल्या गमतीजमती आपल्याला आयुष्यभर आठवते..
आपल्या संस्कृतीची या अमूल्य गुरु-शिष्य महान परंपरा उत्तम रित्या समजून समाज निर्माणात आपले सहयोग प्रदान करावे….अशाच आठवणी आम्हाला पोलीस स्टेशनच्या देखील असाव्यात म्हणून शिक्षक दिनासारख्या शुभ सोहळ्यात आम्ही कासोदा पोलीस स्टेशन तर्फे काहीतरी विशेष करण्याचा निर्णय घेतला
आणि म्हणून हद्दीतील सर्व शिक्षकांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांचा सन्मान करून त्यांना शिक्षक दिना बद्दल शुभेच्छा दिल्या… तेव्हा शिक्षकांनी देखील त्यांना त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीमध्ये पहिल्यांदाच पोलीस स्टेशनला बोलावून सन्मानित करण्यात आल्याने ते आनंदित असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले …पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …
धन्यवाद
निता मोतीलाल कायटे
सहाय्यक पोलीस निरीक्षक
कासोदा पोलीस स्टेशन जळगाव
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377