क्रीडांगण विकास योजनेतंर्गत 20 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
जळगाव,दि. 6 – जिल्हा नियोजन समिती, जळगांव यांच्याकडून उपलब्ध अनुदानातंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांवमार्फत अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान सन 2021-22 साठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत फक्त अनुसुचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय संस्था, अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतीगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने/ समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. अशा संस्था तसेच ग्रामपंचायत, नगरपालीका, महानगरपालीका इत्यादींना त्यांच्या क्षेत्रातील अनुसुचित जाती वस्ती, वाडीसाठी उपलब्धतेनुसार अनुदान मिळणार आहे. त्यासाठी ज्या अनुदानीत शाळा, महाविद्यालय, वसतीगृहे यांच्याकडे फक्त क्रीडांगणासाठी जवळपास दीड एकर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा विहित खेळांचे मैदाने तयार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध आहेत ते अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव करु शकतील.
या योजनेतंर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 मी. अथवा 400 मी. धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणास भिंतींचे/तारेचे कुपन घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह/चेजींग रुम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा/सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर/आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे इत्यादीं बाबींसाठी क्रीडा उपक्रमांची आवश्यता असल्याची खात्री केल्यानंतर अनुदान मंजूर करण्यात येते.
याबाबींपैकी कोणत्याही एका बाबीसाठीच एक वर्षात अनुदान उपलब्धतेनुसार अनुदान मंजूर करण्यात येईल. उल्लेख केलेल्या प्रत्येक बाबींकरीता (प्रस्ताव एकाच बाबींकरिता करावा) अंदाजीत खर्चाच्या 100 टक्के किंवा कमाल 7 लाख रुपया पर्यंतचे अनुदान यापैकी जी रक्कम कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणुन देण्यात येईल. मात्र क्रीडा साहीत्यासाठी कमाल अनुदान मर्यादा 3 लाख रुपये इतकी राहील. क्रीडासाहित्य मागणी प्रस्तावांसाठी शाळा/महाविद्यालय/वसतीगृहे यांच्याकडे मैदाने/हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे.
अनुसुचित जाती उपयोजनेतंर्गत सन 2021-22 या वर्षासाठी अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. तरी या योजनेचा लाभ/फायदा घेवू इच्छिणाऱ्या फक्त अनुसुचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत शासकीय संस्था, अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतीगृहे इत्यादी, ज्यांना शिक्षण विभागाने/ समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर करावे. अर्जाचा विहित नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे दिनांक 20 सप्टेंबर, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. परिपूर्ण प्रस्ताव हा ऑनलाईन jalgaonsports.in या वेबसाईटवर अपलोड करुन अपलोड केलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मुळ कागदपत्र असलेला प्रस्ताव असे दोन प्रतीत प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह सादर करावेत. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377