‘भविष्यातील रोजगाराच्या संधी’16 सप्टेंबरला ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
जळगाव दि. 14 – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने अप्रेंटिसशिप आय.टी.आय, डिप्लोमा, डिग्री पास तरुणांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे गुरुवार, दिनांक 16 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन सत्रात श्री. पी. व्ही. पाटील, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जळगाव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातर्फे करण्यात आले आहे.
खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा,
गुगल मिट लिंक – https://meet.google.com/eep-kpvz-awp
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377