
पाचोरा, दि. 25 – तालुक्यातील कळमसरा येथे मधुकर नेटके वय अंदाजे ५५ वर्षे हा शेतकरी शेत शिवारात आपली एक शेळी चारण्यासाठी गेला असता शेळी चारत असतांना शेळी अचानक पळाल्याने शेळी मागे पळत असतांना याच परिसरात कापूस पिकात जमीनीवर तुटून पडलेल्या विद्युत तारा व त्यातील विद्युत प्रवाहाने या शेतकऱ्याला जोरदार शॉक (करंट) लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी कळमसरा शिवारात घडली आहे.
याबाबत अधिक तपास केला असता कळमसरा शिवारात या परिसरात तारा तुटून पडले असल्याची माहिती मिळते तसेच विद्युत वितरण चे कर्मचारी व अधिकारी यांनी लक्ष न देता उडवाउडवीची उत्तर देत कोणतीही कामे केली जात नसल्याची ओरड येथे कायम असते शिवाययेथील ट्रांसफार्मर मध्ये कायम बिघाड होत असून सदर गावात विज पुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास येते.त्यामुळे येथील भागासाठी नवीन ट्रांसफार्मर बसविण्यात यावा अशी मागणी देखिल आहे
सदर घटने बाबत अधिक माहिती मिळते की पोस्ट मार्टम रिपोर्ट मध्ये विद्युत शॉक लागुन,भाजून मृत्यु झाला असल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी सांगितले तसेच याबाबत पोलिस तपास अधिकारी यांचेशी संपर्क केला असता काही कारणास्त होऊ शकला नाही तर येथील अभियंता यांचेशी भ्रमनध्वनी द्वारे या घटनेची माहिती घेता ते ऑफिस कामा साठी पाचोरा येथे आले होते तेव्हा त्यांना ही घटना झाल्याची खबर मिळली लागलीच त्यांनी सदर विद्युत प्रवाह बंद करण्याचे सुचना दिले असल्याचे सांगितले व विद्युत तारा तुटल्याबाबत आधीच खबर,तक्रार मिळाली असती तर अप्रिय घटना टळुन जीवीतहानी झाली नसती,यासाठी त्यांनी भ्रमनध्वनीवर नागरीकांनी तक्रार करण्याचे आवाहन केले असल्याचे म्हटले आहे.

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



