नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या वारसास ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप
अवघ्या पंधरा दिवसात मदत; आ.किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
पाचोरा,दि.६- सततच्या पावसामुळे तसेच घाटावरील सोयगाव बानोटी आदि भागातील नद्यांचे वाहून येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे हिवरा नदीला आलेल्या पुरातून वाट काढत कृष्णापुरी मधील आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वाहून गेलेल्या धनराज शिंपी वय ४० हा तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती. त्याच्या वारसांना शासनाच्या नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
पाचोरा शहरातून वाहत जाणाऱ्या कृष्णापुरी येथील हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात कृष्णापुरी भागातील शिवकॉलनी मधील युवक देवेंद्र धनराज शिंपी वय ४० हा युवक २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातून कृष्णापुरीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतांना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली होती.दरम्यान स्थानिक नागरिक व प्रशासनाने त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह तब्बल आठवड्याभरा नंतर कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.
सदर युवक रात्री पाऊस जास्त असल्याने व नदीला जास्त पूर असल्याने नदी पार करून जाणे अडचणीचे असल्याने शहरातच रात्री नातेवाईकाकडे मुक्कामी थांबला होता. सकाळी सुमारे ६.३० च्या सुमारास गावातून घराकडे शिव कॉलनी, कृष्णपुरी कडे येत असताना पुलावरील पाणी अचानक पाणी वाढल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे या युवक पाण्याचया प्रवाहात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती.
दरवर्षी होणाऱ्या अशा घटनांमुळे व स्थानिक नागरिकांना व शहरवासीयांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत आ.किशोर अप्पा पाटील यांनी याठिकाणी सुमारे १८ कोटीं रुपयांचा निधी आणत परिसरातील तीन पुलांचे काम सुरू केले आहे. मात्र या कामास अजून सुमारे वर्षभर कालावधी लागणार असल्याची माहिती आहे.अवघ्या पंधरा दिवसात बाधित कुटुंबाला मदत मिळाल्याचे समाधान कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी ३ वाजता झालेल्या या कार्यक्रमात शिवसेनेचे मुकुंद अण्णा बिल्दिकर, शहर प्रमुख किशोर बारावकर, जिल्हा उप प्रमुख ऍड. अभय पाटील, नगरसेवक सतिश चेडे, नगरसेवक बापू हटकर,माजी नगरसेवक गंगाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, नगरसेवक विकास पाटील, तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते चार लाखांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रवीण ब्राह्मणे, भूषण पेंढारकर, यांचेसह महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.दरम्यान शासन सर्व प्रकारच्या नैसर्गीक आपत्तीत जनतेच्या पाठीशी असून काही दुर्दवी घटना घडल्यास जनतेने तात्काळ प्रशासनाला संपर्क करण्याचे आवाहन मुकुंद अण्णा बिल्दिकर यांनी केले आहे.
संततधार पावसामुळे युवक वाहून गेल्याची माहिती मिळताच आ.किशोर अप्पा पाटील यांनी तात्काळ सदर युवकाचा शोध घेण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. दरम्यान सदर युवक सापडून न आल्याने अखेर त्यास मृत गृहीत धरत मदतीसाठीचा प्रस्ताव शासनदरबारी सादर करण्याचा सूचना प्रशासनास दिल्या होत्या त्या अंतर्गत महसूल प्रशासनाने देखील तत्परता दाखवत तात्काळ प्रस्ताव सादर केल्याने अवघ्या पंधरा दिवसातच शासकीय मदत मिळाली.यासाठी तहसीलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, शहर तलाठी आर डी पाटील लिपीक अमोल भोई यांनी विशेष परिश्रम घेतले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377