गुढे येथील नाल्यात वाहून गेलेल्या भीमा माळी यांच्या वारसाला ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप
अवघ्या पंधरा दिवसात मदत; आ.किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
भडगाव दि,१२- सततच्या पावसामुळे आलेल्या पुरात भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी भीमा रामा माळी या इसमाचा येथील मुतऱ्या नाल्यात वाहुन गेल्याने दि.२८ सप्टेंबर रोजी दुर्दवी मृत्यू झाला होता दरम्यान त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखांचा धनादेशाचे वाटप आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते करण्यात आले मयताची पत्नी भागाबाई भीमा माळी यांना त्यांचे गुढे येथील घरी जात आमदारांनी या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. अवघ्या पंधरा दिवसात मयताच्या वारसांना शासकीय मदत मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी तहसीलदार मुकेश हिवाळे,माजी जि प सदस्य विकास पंडीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील(भुरा आप्पा ),शिवसेना तालूका प्रमुख ,डॉ विलास पाटील ,सरपंच प्रकाश कृष्णराव पाटील,किसन माळी, केलास माळी, भगवान महाजन ,सखाराम माळी, तुकाराम माळी यांची उपस्थिती होती.
दरम्यान शासन सर्व प्रकारच्या नैसर्गीक आपत्तीत जनतेच्या पाठीशी असून काही दुर्दवी घटना घडल्यास जनतेने तात्काळ प्रशासनाला संपर्क करण्याचे आवाहन आ.किशोर अप्पा पाटील यांनी केले असून मयताच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377