वरणगाव येथील आगीच्या दुर्घटनेत जिवीत अथवा मालमत्तेची हानी झालेली नाही

वरणगाव – येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या आतील परिमितीच्या भिंतीला दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागली होती. उन्हाळा आणि हवामानामुळे आग लवकर पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथील अग्निशमन युनिटसह जळगाव महानगरपालिका, भुसावळ नगरपरिषद, सावदा नगरपरिषद, दीपनगर औष्णिक प्रकल्प, आयुध निर्माणी, भुसावळ येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अमन मित्तल, जिल्हाधिकारी, जळगाव, गजेंद्र हिरे, वनसंरक्षक, वन विभाग, नाशिक यांनी घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवित वा मालमत्तेची हानी झालेली नाही. असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी कळविले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



