माँ साहेब विडी घरकुल वसाहतीसाठी पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती द्या – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. 27 : सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील माँ साहेब विडी घरकुल वसाहतीसाठी पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेसाठी तातडीने अंदाजपत्रक तयार करून नोव्हेंबर अखेरपर्यंत मान्यता प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
दक्षिण सोलापूर मधील मौ.कुंभारी येथील पाणीपुरवठा योजनेचा आढावा श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, अधीक्षक अभियंता श्री.कदम, कार्यकारी अभियंता श्री.माशाळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले, योजनेचे अंदाजपत्रक आणि मान्यतेची प्रक्रिया नोव्हेंबर अखेर पूर्ण करण्यात यावी. त्याचबरोबर ज्या जलाशयातून या योजनेस पाणीपुरवठा होणार आहे, त्या जलाशयातील गाळ काढण्याचे काम प्रस्तावित करण्यात यावे. यामुळे जलाशयाची पाणी साठवण क्षमता वाढून मुबलक पाणीपुरवठा होऊ शकेल. मॉ साहेब विडी घरकुलाबरोबरच कॉ.गोदूताई परूळेकर नगर, स्वामी समर्थ विडी घरकुल, कॉ.मिनाक्षीताई साने घरकुल आदी लगतच्या वसाहतींमध्ये याच जलाशयातून पाणीपुरवठा होत असल्याने भविष्यात योजना बंद पडणार नाही यासाठी या वसाहतींची शिखर समिती गठित करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377