जिल्हास्तरीय लोकशाही दिन 1 नोव्हेंबरला होणार ऑनलाइन
जळगाव,दि.25 : नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, 1 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता ऑनलाइन होणार आहे.
सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. त्याचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन 1 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे. ज्या नागरिकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377