तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी – मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी
मुंबई, दि. 28 : नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For Transgender Persons) या संकेतस्थळावर जास्तीत जास्त तृतीयपंथी व्यक्तींनी स्वतःहुन पुढे येऊन ऑनलाईन अर्ज भरावा, प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करून घेऊन आपले अधिकार व हक्क यांचे जतन करावे, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर येथे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तक्रारीचे जलद गतीने प्रभावी नियंत्रण निवारण करण्याकरीता जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व उपस्थित स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांना https://transgender.dosje.gov.in या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर समाजातील तृतीयपंथी व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज भरुन तृतीयपंथीयांचे प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी आवाहन केले. जिल्हा निवडणूक कार्यालय, मुंबई उपनगर यांचेमार्फत जिल्ह्यातील तृतियपंथीय पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी अर्ज भरणे तसेच कागदपत्रांची आवश्यकता तसेच कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत विकसित तृतियपंथीय व्यक्ती नोंदणी पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तृतियपंथीय प्रमाणपत्र व ओळखपत्र ५ व्यक्तींना वाटप करण्यात आले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजित साखरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर,प्रसाद खैरनार,अजित साखरे, किन्नरमा संस्था, हमसफर संस्था यांचे प्रतिनिधी, जिल्हा नियोजन अधिकारी भुषण देशपांडे या बैठकीला उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377