शिक्षकां प्रति आदरभाव व्यक्त करत विद्यार्थ्यांनी केले ज्ञानदानाचे कार्य

“क्षण हे आनंदाची आपण सारे वेचू…”
पाचोरा, दि 5- आज 5 सप्टेंबर ‘शिक्षक दिन’ श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा (भ.रो विभाग )येथे विद्यार्थ्यांनी घरातूनच शिक्षकांची भूमिका साकारत वेगवेगळ्या विषयात मार्गदर्शन केले. त्यात इयत्ता 1ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी, गणित ,इतिहास ,परिसर अभ्यास या विषयांच्या अध्यापनाचे कार्य करत आपल्या शिक्षकांनी प्रति आदरभाव व्यक्त केला. तसेच काही विद्यार्थ्यांनी ग्रीटिंग कार्ड, शुभेच्छा संदेश तयार करून शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाबद्दल, शैक्षणिक कार्याबद्दल, तसेच भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या कारकिर्दी बद्दल माहिती सांगितली.
शिक्षकांनी देखील मुलांना शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थी सतत शिकत राहावे हे प्रत्येक शिक्षकाचे उद्दिष्ट असते.
इयत्ता 1ली साठी मार्गदर्शन श्री दीपक सर आणि श्री राहुल वाघ सर, इयत्ता 2री साठी मार्गदर्शन श्रीमती सारिका पाटील मॅडम आणि श्रीमती चारुशीला पाटील मॅडम इयत्ता 3री साठी मार्गदर्शन श्रीमती जयश्री पाटील मॅडम आणि श्री भूषण पाटील सर इयत्ता 4थी साठी श्री संदीप वाघ सर व श्रीमती रुपाली निकम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



