प्राथमिक शिक्षणाची अनास्था शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची कामे
पाचोरा – तालु्यातील शिक्षण व्यवस्थेचा घो झाला असल्याचे चित्र असून विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्कार होण्याऐवजी त्यांचेकडून शिपयासारखी कामे करून घेतली जात आहे.आपला मुलगा व मुलगी शिकून मोठा होईल हा भाबडा विश्वास ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवतात.मात्र काही शाळांमध्ये शिक्षक तर काही शाळांमध्ये संपूर्ण तास होत नसल्याचे चित्र आहे.तालुक्यातील बहुसंख्य शाळामधील नियुक्त शिक्षक तालुक्याच्या ठिकाणावरून ये जा करतात.त्याचा देखील परिणाम शैकणिक गुणवत्तेवर होत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये कमी पगारावर सर्वसाधारण शिक्षकांची नियुक्ती होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान व पालकांचा अपेक्षाभंग होत आहे .एकंदरीतच मराठी तसेच इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांवर शिक्षण विभागाने लक्ष देवून चुकीच्या बाबींवर पायबंद घालावा व गुणवत्ता वाढीसाठी उपाय योजना कराव्या अशी मागणी होत आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377