जळगाव, दि.25: जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. नवीन सूचने प्रमाणे मुख्यध्यापकांच्या सही व शिक्का असलेले प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज आगोदरच अपलोड केले आहेत त्यांनी संबंधित मुख्याध्यापकांचा सही व शिक्का असलेले प्रमाणपत्र प्राचार्य, नवोदय विद्यालय भुसावळ, जि. जळगाव यांना टपालाने किंवा pritikhaira1518jnvjalgaon.org या ई- मेल आयडीवर पाठवावेत. सर्व गट शिक्षणधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, संबंधित पालकांनी काळजीपूर्वक सूचनांचे पालन करावे, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. बातमी लाईक करा,शेअर करा खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber Z4 NEWSमुख्य संपादक- उमेश राऊतमो : 8411009377