ई-श्रम योजनेच्या लाभासाठी ‘सीएससी’ नि:शुल्क सेवा
जळगाव, दि.18: आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांच्यामार्फत जळगाव जिल्ह्यात ई- श्रम व आयुष्यमान भारत आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. ई- श्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राकडून नि:शुल्क सेवा उपलब्ध आहे. आयुष्यमान भारत योजनेसाठी 30 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी दर फलक, केंद्राचे बॅनर, सेवांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी, केंद्राच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक राहील. आपले सरकार सेवा केंद्राची यादी जिल्ह्याचे संकेतस्थळ www.jalgaon.nic.in यावर उपलब्ध आहे. आपल्या जवळील केंद्रावर नागरिकांनी जावून या योजनांचा लाभ घ्यावा. ई- श्रम सेवेची कोणतीही आकारणी आपले सरकार सेवा केंद्रांना करण्यास निर्बंध आहेत. तसेच ई- श्रम योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांकडून आकारणी करण्यात येवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ही सेवा उपलब्ध आहे. सदरचे काम कामकाज या व्यतिरिक्त कोणत्याही खासगी संस्थेस दिलेले नाही. काही तक्रार असल्यास अभिनंदन मधुकर पाटील, जिल्हा व्यवस्थापक, सीएससी जळगाव (7264811570), गजानन शांताराम पाटील, जिल्हा व्यवसथापक, सीएससी, जळगाव (8087305060), राहुल रतन गायकवाड, जिल्हा समन्वयक, सीएससी, जळगाव (7249468477) यांच्याकडे तक्रार करावी, असे शुभांगी भारदे, नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377