
पाचोरा:- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या आर्थिक विकासात एक महत्वाची संस्था असून येथील दैनदिन व्यवहारत शेतिमाल व फळ-फळावले यांचे मोठे व्यवहार होत असतात,तसेच वेळोवेळी अनेक समस्याही निर्माण होत असतात व्यापारी,मजूर,कष्टकरी,अड़ते यांचे व्यवहार सुरळीत पार पडत असताना व्यापाऱ्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी व बाजार समिती यांचेशी आपल्या असणा-या समस्यांचे निराकरण करनेसाठी व्यापार क्षेत्रात काम करणारी पाचोरा कृ.उ. बाजार समिती येथील पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असोशिएशन या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक विद्यमान अध्यक्ष श्री.सुभाष शेठ अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली दि २८.डिसे रोजी पाचोरा कृ.उ.बाजार समिती येथे संपन्न झाली.
२०२१ ते २०२२ या कालावधीसाठी सर्वानुमते नविन कार्यकारीणी गठीत करणे या विषयाच्या अनुषंगाने नवीन कार्यकारिणी गठीत करणे आणि पदाधिकारी यांची निवड करणे या विषयावर सर्वानुमते एकमत होऊन ठराव संमत करण्यात आला व नवनिर्वाचित कार्यकारीणी गठीत केली गेली त्याप्रमाणे अध्यक्ष-श्री.सुभाष शेठ अग्रवाल,उपाध्यक्ष-श्री.दिलीप शेठ मोर,सचिव-श्री.पारस मुनोत सहसचिव-श्री.सचिन येवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदर निवडी नंतर पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील प्रशासकीय मंडळातील सदस्य श्री.चंद्रकांत धनवडे,बाजार समीती सचिव श्री बाळासाहेब बोरुडे,प्रतिक ब्राम्हने आदींनी नवनिर्वाचीत सदस्यांचा सत्कार करुन त्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



