कृ.उ.बा.स.सभापती गणेश पाटील यांचे प्रयत्नाने म्हशी व शेळी मेंढ्यांचे बाजार पूर्ववत चालू होणार

पाचोरा – कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा च्या कार्यक्षेत्रातील वरखेडी व नगरदेवळा येथील गुरांचे बाजार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने लंपी स्किन डिसीज आजारामुळे दिनांक २८/८/२०२३ पासून बंद करण्यात आलेले होते परंतु हा आजार शेळी मेंढी व म्हशी या गुरांमध्ये आढळून येत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे त्यामुळे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी व व्यापारी यांच्या मागणीनुसार बाजार समितीचे सभापती श्री गणेश भीमराव पाटील यांनी पाचोरा भडगाव पाचोरा भडगाव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री किशोर आप्पा पाटील साहेब यांच्या मार्फत जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे म्हशी व शेळी मेंढीचे बाजार पूर्ववत चालू व्हावे यासाठी वेळोवेळी पाठपुरवठा केलेला होता सदर मागणीनुसार आज दिनांक ०४/०९/२०२३ रोजी माननीय किशोर आप्पा पाटील साहेब यांच्या समवेत जिल्हाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन व सदर विषयाबाबत सविस्तर चर्चा करून शेळी मेंढी व म्हशी यांचे गुरांचे बाजार चालू होण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे त्यानुसार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी व व्यापारी बांधवांना आव्हान करण्यात येते की बाजार समितीचे वरखेडी व नगरदेवळा येथील गुरांचे बाजार गो वंशीय जनावरे( बैल व गाय )सोडून म्हशी व शेळी मेंढ्यांचे बाजार पूर्ववत चालू झाले आहेत तरी सर्व शेतकरी व्यापारी बांधवांनी आपली गोवंशीय जनावरे सोडून बाजार समितीत विक्रीस आणावे. सदर गुरांचे बाजार शेतकरी हितासाठी चालू केल्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गातून माननीय आमदार साहेब किशोर आप्पा पाटील तसेच बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .
गोवंशीय गुरांचा बाजार ( गाय बैल पारडू ) पुढील आदेश होईपर्यंत बंद राहील याची नोंद घ्यावी कोणीही गोवंशीय पशुधन बाजारात किंवा परिसरात आणू नाही अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन गणेश पाटील यांनी केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



