पाचोरा,८- शहरातील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षिकेला विद्यार्थीनिंनी वाजत गाजत सेवानिवृत्ती चा निरोप दिल्याने शिक्षिकेला अश्रुंचा बांद फुटला
शाळेतील सेवानिवृत्ती चा निरोप समारंभ शहरातील दोन ठिकाणी करण्यात आला यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनिंसह शाळेतील कर्मचारी वर्गाने शहरातील माध्यमिक वउच्च माध्यमिक विद्यालयात केला. शाळेतील विद्यार्थींनी प्रिय शिक्षिका श्रीमती मायाताई सुर्यवंशी यांचा कर्तव्यपुरर्ती निरोप समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सोनवणे, प्राचार्य संजय पवार, अॅड योगेश पाटील, पत्रकार संदीप महाजन, मुख्याध्यापिका भारती बागड, प्रा. रविंद्र चव्हाण, ओरीएंट सिमेंट कोल्हापूर चे विभागिय व्यवस्थापक सुयोग साळोखे, डॉ. अनिल देशमुख, राहुल देशमुख, प्रमोद गरुड, जे. व्ही. शिंदे, नंदु सोमवंशी, सौ. सुप्रिया सोमवंशी, सौ. अर्चना साळोखे आदी उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ” इतनी शक्ति दे दाता हे गित ” प्रा. प्रतिभा राठोड यांनी सादर केले. यावेळी संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गाने सत्कारमूर्ती श्रीमती मायाताई सुर्यवंशी यांचा सत्कार केला. यावेळी श्रीमती मायाताई सुर्यवंशी यांनी डॉ दिपक पवार, डॉ निलेश पवार, लोकेश पाटील यांनी उच्च पदवी संपन्न केली म्हणून सत्कार केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनींनी आपल्या लाडक्या शिक्षाकेला आपल्या हस्त कलेच्या वस्तू दिल्या. प्रमुख पाहुण्यांनी समयोचित भाषणे केली. शाळेतुन निघतांना ढोल ताशा लावुन बिदाई करण्यात आली यावेळी श्रीमती सुर्यवंशी यांना अश्रू अनावर झाले. आगळ्यावेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनिंसह शाळेतील कर्मचारी वर्ग शहरातील मान्यवरांनी त्यांना निरोप दिला यावेळी. विद्यार्थींनी गाडीची सजावट फुलांनी केली होती. काही अंतरापर्यंत विद्यार्थ्यांनींनी सेवानिवृत्त शिक्षिकेच्या मागे चालत गेल्या. लाडक्या शिक्षिका आता शाळेत शिकवायला येणार नाही याचे दुःख विद्यार्थींना होते. या कर्तव्यपुरर्ती सोहळ्याची चर्चा परीसरात सुरु आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचल श्रीमती उज्वला देशमुख, मौलाना अमजद यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अथकपरीश्रम घेतले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377