येवला तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे जलदगतीने करावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. 16 : जलजीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे तसेच राजापूरसह ४१ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही जलदगतीने करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील या गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे कामांना प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी केली होती.
मंत्रालयातील परिषद सभागृह येथे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव संजीव जयस्वाल, आमदार नरेंद्र दराडे, मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, नाशिकचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे, कार्यकारी अभियंता महेश पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, जिल्हा प्रशासन अधिकारी किरण देशमुख, कार्यकारी अभियंता राजेंद्र गोगाटे, श्री.वसंत पवार, ३८ गावे पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर,बाळासाहेब लोखंडे यावेळी उपस्थित होते.
पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गाव व राजापूरसह ४१ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यतेबाबत कार्यवाही करून या योजनेंतर्गत सर्व कामे गतीने करण्यात यावीत. राजापूरसह ४१ गावांच्या योजनेच्या १६२ कोटी रूपयांच्या कामांनाही लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल. पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने पंप हाऊस मधील पंप बदली करणे व इतर सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.
येवला तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे लवकर पूर्ण करावी – पालकमंत्री छगन भुजबळ
पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले,धुळगाव व १७ गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे.येथील अस्तित्वातील ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला इतर टंचाईग्रस्त १६ गावे व ११ संस्था जोडल्यामुळे ही योजना ५४ गावे व ११ संस्थांना पाणीपुरवठा करीत आहे त्यामुळे ३८ गावांची असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर अतिरिक्त भार निर्माण झाला आहे. ही मूळ योजना सुरू रहावी तसेच इतर टंचाईग्रस्त गावांनाही पिण्याचे पाणी मिळावे यासाठी धुळगाव व १७ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता देणे,पाणी आरक्षण प्रस्ताव मान्यता ही कामे प्राधान्याने पूर्ण केली जावीत.तसेच राजापूरसह ४१ गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. अवर्षणभागातील टंचाईग्रस्त गावांकरिता ही योजना सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे तरी या योजनेचाही पाणी आरक्षण प्रस्ताव, पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने कामांकरिता भुसंपादनासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. १६२ कोटी रूपयांच्या या कामांना प्रशासकीय मान्यता देवून ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश श्री.भुजबळ यांनी दिले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber