पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समिती येथील मुख्य आवारात नवीन हंगामातील शेतीमालाची प्रचंड प्रमाणात आवक सुरु – सभापती गणेश पाटील

पाचोरा – कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोराच्या मुख्य आवारात या वर्षीच्या नवीन हंगामातील ज्वारी , मका, बाजरी, सुर्यफुल, गहु, हरभरा, तूर सह सोयाबीन शेतीमालाची आवक पाचोरा-भडगाव कार्यक्षेत्रातून तसेच सोयगाव, सिल्लोड, कन्नड, जळगाव ग्रामीण, पारोळा, धरणगाव, ऐरंडोल, अमळनेर, चाळीसगाव या परिसरातून प्रचंड प्रमाणात येत असून बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त बोली बोलून जाहीर लिलावाने विक्री होत आहे. यापुढे देखील ज्वारी, मका, बाजरी, सुर्यफुल, गहु हरभरा, तूर सह सोयाबीन शेतीमालाचे लिलाव जलद गतीने होऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजार भाव मिळून ,उत्तम प्रकारे सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच चोख वजन माप व तात्काळ पेमेंटची बाजार समितीमध्ये सुविधा असल्यामुळे बाजार समितीच्या आवारात शेतीमालाची प्रचंड आवक येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणावा. खाजगी ठिकाणी आपला शेतीमाल विक्री करू नये त्यामुळे खाजगी ठिकाणी आपली फसवणूक होणार नाही. असे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती यांनी केले.बाजार समितीमध्ये दि.८/०४/२०२४रोजीची आवक होणाऱ्या शेतीमालाचा तपशील खालीलप्रमाणे.

यावेळी सभापती श्री.गणेश भिमराव पाटील, उपसभापती श्री. प्रकाश अमृत पाटील, श्री. प्रकाश शिवराम तांबे, श्री.मनोज प्रेमचंद सिसोदिया, सौ.पूनम प्रशांत पाटील, श्री. सुनिल युवराज पाटील,श्री,युसुफ भिकन पटेल, श्री. लखीचंद प्रकाश पाटील, श्री. राहुल रामराव पाटील, श्री. शामकांत अशोक पाटील, श्री.विजय कडू पाटील, श्री. निलकंठ नरहर पाटील, श्री. प्रशांत दत्तात्रय पवार, श्री. राहुल अशोक संघवी यांच्यासह सर्व व्यापारी बांधव व बाजार समितीचे सचिव उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



