राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन-पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी केले स्वागत
जळगाव, दि. 27 :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जळगाव विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले.
यावेळी त्यांचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जैन इरिगेशनचे अतुल जैन यांनी त्यांचे स्वागत केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377