पाचोरा: दिनांक 10 मार्च ला NAC चे जेष्ठ नेते श्री अनिल तात्या पवार यांचे अध्यक्षतेखाली येथे शासकीय सर्व महामंडळ तसेच सहकार विभागातून तसेच निम शासकीय महामंडळ यांचे सेवेतून विविध खात्यातील निवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या प्रचंड उपस्थितीत यशस्वी मेळावा संपन्न झाला. सदर मेळावा हा श्री विठ्ठल मंदिर पाचोरा येथे घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री देविसिंग अण्णा जाधव,जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री अरविंद भारंबे, जिल्हा सचिव श्री रमेश नेमाडे हे उपस्थित होते. सदर वेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले

निवृत्त झालेले कर्मचारी यांना मिळत असलेली अत्यल्प पेन्शन ही तुटपुंजी ठरत असून दैंनदिन गरजा पूर्ण करण्याची वानवा होत आहे. EPS 95 या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत अनेक विभागातील निवृत्त कर्मचारी सहभागी होते यात एसटी महामंडळ, कोऑपरेटिव्ह बँक, खत कारखाना आदी क्षेत्रांतील लोकं उपस्थित होते,

या मेळाव्याचे प्रसंगी आपल्या मनोगतात अनेकांनी पेन्शन वाढ होणे का गरजेची याची वास्तविकता विषद करुन 500 ते 2000 रू इतकी कमी असलेली रक्कम ही 7500 हजार रू पेक्षा जास्त होऊन निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची रक्कम मिळून ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांचे जीवन जगणे सुकर होईल असा आशावाद व्यक्त केला ज्या प्रकारे राजकीय उच्च पद उपभोगलेली व्यक्ती आमदार/खासदार असो की मुख्यमंत्री/ पंतप्रधान यांची पेन्शन ही भरभरून मिळते किंबहुना त्यात वेळोवेळी वाढ होत असते तसेच या महामंडळातील कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणे हा मूलभूत हक्कांचा भाग आहे असे असले तरी 6 लाख कोटी प्रोविडेंट फंड केंद्रीय स्तरावर शिल्लक असल्याचं बोललं जातं असले तरी कार्मिक मंत्रालयाकडून Eps 95 योजने बाबत कार्यवाही करण्यास का उशीर होत आहे हे नक्कीच अनाकलनीय नसले तरी हत्ती निघाला पण शेपूट बाकी अशीच अवस्था आज या सर्व महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांची झालेली दिसते.
सदर मीटिंग मध्ये पाचोरा तालुका Eps95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्षपदी महावितरण निवृत्त इंजी.नंदलाल बोदडे तर सचिव पदी जेडीसीसी बँक निवृत्त शाखा धिकारी दिलीप झोप यांची सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित निवृतिधारकानी सर्वानुमते निवड केली गेली

पुढील दिशा ठरविण्साठी वेळोवेळी एकत्र येऊन लढा देण्याची तयारी असल्याची भुमिका मांडन्यात आली व मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी पाचोरा यांना सादर करण्यात आले.

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009



