आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोऱ्यात JC’s व रोटरीचा होली मिलन निमित्त संगीत संध्येचा कार्यक्रम जल्लोषा संपन्न

पाचोरा- येथील जूनियर चेंबर ऑफ इंडिया (JC’s) शाखा पाचोरा आणि रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने होली मिलन निमित्त आयोजित संगीत संध्या जल्लोष पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. दिनांक 19 मार्च रोजी बनोटीवाला फार्म हाऊसच्या हिरवळीवर झालेल्या या कार्यक्रमात रंगांची उधळण आणि संगीत सुरांची मैफिल संस्मरणीय ठरली.

जे.सी.आय. व रोटरी क्लब च्या संयुक्त विद्यमाने द म्युझिक्रॅट्स युनायटेड ग्रुप मुंबई च्या संगीत सुरांनी होली मिलन संध्येला रंगत आणली. गणेश वंदना ने सुरू झालेल्या या संगीत संध्येत लोकप्रिय हिंदी- मराठी चित्रपटातील तसेच चिरतरुण अल्बम गीते सादर करण्यात आली. रोटरी क्लबचे उपप्रांतपाल रो. राजेश बाबूजी मोर यांच्या संकल्पनेतून ही संगीत संध्या घेण्यात आली. द म्युझिक्रॅट युनायटेड ग्रुप मधील मुख्य गायक शुभम साबळे, पर्कशन वाद्य वादक प्रीतम गच्‍चे, आणि गिटारिस्ट तथा गायक अथर्व कानेटकर यांनी उपस्थितांची मने जिंकली.

या संगीत संध्येस जय किरण प्रभाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी नृत्याविष्कार सादर करून प्रदीर्घ कार्यक्रमाची गोडी वाढवली. आश्विनी जळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी जळतकर हिने सोलो नृत्य आणि विद्यार्थिनीच्या दोन समूह नृत्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. या समूह नृत्यामध्ये सारिका पाटील, तनिष्का पाटील, भावीका, सायली, समृद्धी, सुप्रिया, निकिता, आकांक्षा व वैष्णवी इत्यादी विद्यार्थिनींनी भाग घेतला.

कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला स्वागत कमानी जवळच रंग लावून व त्यांच्यावर रंगाची उधळण करून स्वागत केले जात होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रो. डॉ. बाळकृष्ण पाटील व जे.सी. रोहित रिझानी यांनी प्रास्ताविक सादर केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपप्रांतपाल राजेश मोर यांचा जे.सी. जीवन जैन यांनी तर जेसिस चे झोन उपाध्यक्ष जे.सी. मयुर दायमा यांचा रो.डॉ. अमोल जाधव यांनी सत्कार केला. बनोटीवाला परिवाराचे ज्येष्ठ सदस्य कांतीलाल जैन यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

रो.डॉ. पंकज शिंदे आणि जे. सी. पियुष अग्रवाल यांनी आभार मानले. रो.प्रा. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला रोटरी व जेसिस क्लबचे सर्व पदाधिकारी सदस्य सहपरिवार उपस्थित होते. रो. निलेश कोटेचा, ज्युनियर जे.सी.मीतेश जैन व त्यांच्या सर्व तरुण सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!