म.रा.वि.वि.क चाळीसगाव येथील सहा.अभियंता यांना मारहाण, तक्रार दाखल
फिर्याद
चाळीसगाव- शहर पोलीस स्टेशन येथे दि.25/03/2022
श्री. भरत धन्यकुमार उकलकर वय 42 वर्षे, धंदा-नोकरी(सहा.अभियंता) म. रा. वि. वि. के.
मर्या, चाळीसगाव शहर कक्ष-2,फुले कॉलनी मिल गेट जवळ,चाळीसगाव रा. आई हॉस्पिटल जवळ, बाप्पा
पाँईट, चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव मो.नं. 8411971789 समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहुन फिर्याद देतो की, मी वरील ठिकाणी सुमारे गेल्या दिड वर्षापासुन
सहाय्यक अभियंता म्हणुन चाळीसगाव शहर कक्ष- 2 या ठिकाणी नेमणुकीस आहे. माझ्याकडे कक्षांतर्गत थकबाकी वसुली करणे तसेच कक्षांतर्गत विद्युत वाहिनींची देखभाल व कार्यलयीन कामकाज सोपविलेले आहे.
आज दिनांक 25/03/2022 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 09.00 वा.चे सुमारास मी घरुन म.रा.वि.वि.कं.मर्या. चाळीसगाव शहर कक्ष- 2 ,फुले कॉलनी मिल गेट जवळ, चाळीसगाव येथील माझे
कार्यालयात ड्युटीवर आलो. माझे कार्यालयात मी कामकाज करीत असताना दुपारी 01.15 वाजेच्या सुमारास माझ्या ओळखीचा आमीर निसार शेख उर्फ बबडी शेख व त्याचे सोबत एक अनोळखी इसम कार्यालयात आले व त्यातील एका अनोळखी इसमाने मला सांगितले की, मी दोन दिवसाआधी माझी लाईट बिलची थकबाकी भरलेली आहे तुम्ही माझा विज पुरवठा सुरळीत करुन द्या त्यानंतर मी त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव धनराज अशोक पाटील रा.इंदिरा नगर,झोपड पट्टी,फुले कॉलनी
चाळीसगाव असे सांगितले त्यानंतर मी त्यांचा ग्राहक नंबर घेतला (ग्रा.क्र.119764296319) सदर ग्राहक क्रमांकाची आमच्या अभिलेखावर तपासणी केली असता सदर ग्राहक क्रमांकाचा विज पुरवठा कायम स्वरुपी खंडीत केलेला होता. त्यावर मी धनराज पाटील यांना सांगितले की, तुमचा विजपुरवठा कायम
स्वरुपी खंडीत असल्याने तुम्हाला नविन कनेक्शन घ्यावे लागेल त्यासाठी महावितरण कंपनीचे नियमानुसार कागदपत्रे सादर करावी लागतील असे सांगितल्याने त्याला त्याचा राग आल्याने त्याने मला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे मी कायदेशीर तक्रार देण्याकामी पोलीस स्टेशनला जाणेकरिता कार्यालयातुन बाहेर
आलो व कार्यालया समोर उभा राहिला असता धनराज पाटील याने मला चापटाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी आमच्या कार्यालयात काम करणारे राहुल अमृत हडप, प्रदिप सखाराम राखुंडे, मिलींद विठ्ठलसिंग राजपुत अशांनी मला धनराज पाटील याचे तावडीतुन
सोडविले त्यानंतर तो शिवीगाळ करत कार्यालयाच्या आवारातुन निघुन गेला.धनराज पाटील हा कार्यालयात शिवीगाळ व कार्यालया बाहेर मारहाण करीत होता त्याचे व्हिडिओ चित्रीकरण आमचे कार्यालयीन कर्मचारी मिलिंद विठ्ठलसिंग राजपुत व राहुल अमृत हडप यांनी त्यांचे मोबाईलमध्ये केले आहे.त्यावेळी देखील त्याने
बाहेर जात असतांना तुला दाखवतो अशी धमकी दिली. इसम नामे धनराज अशोक पाटील याने मला शिवीगाळ करुन मी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करुन, मला चापटाबुक्यांनी मारहाण करुन धमकी दिली म्हणुन माझी त्याचे विरुद्ध फिर्याद आहे. माझी वरील फिर्याद मी वाचुन पाहिली ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरी असुन संगणकावर टंकलिखीत केलेली आहे. समक्ष हि फिर्याद दिली .
बातमी लाईक करा,शेअर करा
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377