मुंबई, दि. 12 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पुराभिलेख संचालनालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचे १३ एप्रिल रोजी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे.
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्ताने राज्यभर सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुराभिलेख संचालनालयामार्फत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील महत्त्वपूर्ण घटना असणाऱ्या अभिलेख व छायाचित्रांचे चित्रण प्रदर्शित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनास सर्वसामान्य नागरिक आणि इतिहासाचे अभ्यासक तसेच वाचक वर्गाने भेट द्यावी, असे आवाहन पुराभिलेख संचालनालयाचे संचालकांनी केले आहे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377