भारत तर सोडाच ‘खान्देश’ ही देश म्हणूनही अनेक श्रीमंत देशांपेक्षा भारी आहे – संजय आवटे
पाचोरा – न्यूझीलंड, इस्रायल, पोर्तुगालपेक्षा या देशांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे या देशाची. म्हणजे खान्देशाची.
स्वतंत्र अशा इथल्याच एक ना दोन, वीसेक भाषा आहेत.
पाकिस्तानसारखा देश धर्माच्या मुद्द्यावरून जन्मला. आणि, भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा दुभंगला. इथे, आमच्या अहिराणीच्याच बारा उपभाषा आहेत. शिवाय आदिवासींचे भाषावैभव वेगळेच. सांस्कृतिक श्रीमंती आणि खाण्यापिण्याची रेलचेल तर विचारूच नका.
‘आयडिया ऑफ खान्देश’ समजली तरी भारताची गोष्ट कळण्याची सुरूवात होईल. विविधतेत असलेली एकता हेच खरे भारताचे वेगळेपण असून यावरच भारत देशाची एकता टिकून असल्याचे प्रतिपादन पत्रकार संजय आवटे यांनी केले.पाचोऱ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.जयंती उत्सव समितीच्या वतीने पत्रकार संजय आवटे यांचे “आम्ही भारताचे लोक” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते खलिल देशमुख, न. पा. आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा मा. नगरसेवक विकास पाटील, अजहर खान, दैनिक जनशक्तीचे निवासी संपादक डॉ. युवराज परदेशी, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख प्रा. गणेश पाटील, एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले, बाजार समितीचे प्रशासक रणजीत पाटील आदी मंचावर विराजमान झाले होते.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका नजिक असलेल्या हुतात्मा स्मारक येथे दि. २२ रोजी सायंकाळी ८ वाजता आयोजित व्याख्यानात संजय आवटे यांनी “आम्ही भारताचे लोक” या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. व्याख्याना प्रसंगी खलिल देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन उत्सव समिती अध्यक्ष प्रविण ब्राम्हणे यांनी केले. यावेळी ए. बी. अहिरे, दिपक आदिवाल, पत्रकार नगराज पाटील, आत्माराम गायकवाड, शामकांत सराफ, नंदु शेलकर, गणेश शिंदे, अमोल झेरवाल ,उमेश राऊत सह मोठ्या संख्येने श्रौते उपस्थित होते. व्याख्यान यशस्वीतेसाठी राजरत्न पान पाटील, आकाश थोरात, शुभम खर्चाणे, राजु सोनवणे, अनुराग खेडकर, मनोज ननावरे, अमोल कदम, मिलिंद तायडे, विकास थोरात, भुषण खैरनार, जयेश तायडे, विश्वनाथ भिवसने, विजय गायकवाड, अमोल पवार यांनी परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377