मिठाबाई कन्या शाळेचा शंभर टक्के निकाल
पाचोरा- येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालय, कोंडवाडा गल्ली पाचोरा या शाळेचा इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थिनी उच्च गुणवत्तेसह उत्तीर्ण झाल्या आहेत.
येथील पांचाळेश्वर नगर- कोंडवाडा गल्लीत खास मुलींचे मध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. यावर्षी 81 विद्यार्थिनी बारावीच्या परीक्षेला बसलेल्या होत्या. 12 वी कला शाखेत बोर्डाच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व 81 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पैकी पहिल्या 10 विद्यार्थिनींना विशेष प्राविण्य, 55 विद्यार्थिनींना फर्स्ट क्लास तर 5 विद्यार्थिनी सेकंड क्लास मध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत.
पाचोरा तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे शंभर टक्के निकाल असलेली कनिष्ठ महाविद्यालय म्हणून शाळेने आपली परंपरा कायम राखली आहे. अनुभवी व उच्चशिक्षित अध्यापक वर्ग, फक्त मुलींसाठी चालवलेले कन्या महाविद्यालय, वैयक्तिक लक्ष व सतत अभ्यासाची तयारी करून घेण्याचे विविध उपक्रम यामुळे मिठाबाई कन्या विद्यालय विद्यार्थिनी व पालकांच्या विश्वासाची शाळा म्हणून ओळखली जाते. विठाबाई कन्या शाळेत इयत्ता बारावी कला शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे:-
प्रथम-
पाटोदे हर्षदा सुनील (80:13)
द्वितीय
पाटील खुशी रवींद्र (80)
तृतीय
पाटील किमया रामकृष्ण (78)
चतुर्थ क्रमांक
हवाळे प्रीती प्रकाश (77:33)आणि
पाचवा क्रमांक
पाटील मोहिनी रवींद्र (77:27)यासह 10 विद्यार्थिनी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झालेल्या आहेत.
यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशील राजे पवार, सेक्रेटरी सौ रुपाली ताई पवार, प्राचार्य संजय पवार, पर्यवेक्षक साहेबराव पाटील, प्राध्यापक , शिक्षक -शिक्षिका यांनी अभिनंदन केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377