श्री.सु.भा.पाटील प्रा.विद्या मंदिर पाचोरा येथे शैक्षणिक “प्रवेशोत्सव “संपन्न
पाचोरा दि,१५- पा.ता.सह.शिक्षण संस्था संचलित, श्री.सु.भा.पाटील प्रा.विद्या मंदिर पाचोरा,येथे आज शैक्षणिक वर्ष 2022/23 “प्रवेशोत्सवाचे” आयोजन करण्यात आले होते.शालेय इमारत तोरण,फुले,रांगोळी,स्वागत फलक व फुगे लावून सजवण्यात आली होती. मुख्य इमारत सकाळ सत्रात शालेय समितीचे चेअरमन बापुसो.जगदीश पंडितराव सोनार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब- पुष्प,पुस्तके व गोड खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.उज्वला साळुंके मॅडम यांच्या हस्ते पालकांचे स्वागत करण्यात आले.त्याचप्रमाणे मुख्य इमारत दुपार सत्रात स्वर्गीय कल्पना अजय थेपडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ थेपडे बिल्डकॉनचे संचालक श्री.अपूर्व थेपडे व माहेश्वरी महिला मंडळच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.प्रा.अजय थेपडे,शाळेच्या माजी शिक्षिका श्रीमती.शोभा थेपडे मॅडम ,मा.मुख्याध्यापक व जेष्ठ शिक्षिका श्रीमती.लक्ष्माबाई सोनवणे मॅडम यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
भडगाव रोड विभागात समस्त पालक वर्गाच्या हस्ते तसेच ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.सारिका पाटील मॅडम,ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.जयश्री पाटील मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब-पुष्प,पुस्तके व गोड खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे औक्षण करून उत्साहात स्वागत करण्यात आले.
श्री.दीपक पाटील व श्रीमती.चारुशीला पाटील मॅडम यांनी विद्यार्थी स्वागत गीत सादर केले.श्रीमती.सारिका पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन श्री.मनोज पवार व श्री.दीपक पाटील यांनी केले तर आभार श्रीमती.वर्षा पाटील व श्री.संदीप वाघ यांनी मानले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377