श्री.गो. से. हायस्कूल, पाचोराचा एस. एस. सी. परीक्षा निकालाची तालुक्यात प्रथम क्रमांकाची परंपरा कायम

पाचोरा येथील श्री गो से हायस्कूलचा एस. एस. सी. परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात विद्यालयाचा ९५.५९% निकाल लागला. यात विशेष प्राविण्य २२७ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १३८ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ४५ विद्यार्थी तर तृतीय श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विद्यालयातील प्रथम ५ क्रमांकाचे विद्यार्थी पुढीप्रमाणे-
१) विसपुते सिद्धम धीरज ९७.६०*%
२). शिंपी श्रुती प्रवीण९७.४०℅
३) सोमवंशी श्रावणी सतीश ९६.००%
४) धुमाळ हर्षदा बाळकृष्ण ९५.६०%
५) बोरुडे शीतल बाळू ९४.२०%
याप्रमाणे निकाल जाहीर झालेला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शन करणारे शिक्षक या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ, चेअरमन नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव महेश देशमुख व्हा.चेअरमन नानासो व्ही टी जोशी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, स्थानिक चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन , मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला ताई वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील,एन आर पाटील ए बी अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर बंधू- भगिनींनी कौतुक केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



