आमदार संतोष बांगर यांचे कार्यकर्त्यां सहित मुंबईत शक्तीप्रदर्शन
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहापाशी येऊन प्रचंड शक्तीप्रदर्शन केले.
आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना कोरोना काळात स्वतःच्या बँकेतील ठेवी मोडून मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा असा हा आमदार असल्याचे कौतुकाने सांगत त्याला त्याच्या पदावरून दूर करणे कुणालाही शक्य नाही असे मा.मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
तसेच भविष्यात देखील जनसामान्यांची सेवा त्यांच्या हातून अशीच घडावी अशी अपेक्षा यासमयी व्यक्त केली. यापुढे एकाही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही असेही याप्रसंगी बोलताना ठामपणे सांगितले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377