महाराष्ट्र
जप्त केलेल्या मालमत्तेची जाहीर लिलावाव्दारे विक्री
जळगाव,दि 22:जिल्हाधिकारी यांच्या आदेशानवये महाराष्ट्र करमणुक शुल्क अधिनियम 1923 चे कलम 5 अंतर्गत शेंदुर्णी येथील केबल ऑपरेटर किरण रघुनाथ गुजर यांच्याकडून पन्नास हजार रुपये दंड वसुली करण्याचे आदेश दिलेले होते. रक्कम वसुली करणेबाबत यापूर्वी किरण गुजर यांनी पाच हजार रुपये चलनाद्वारे भरणा केलेला आहे. परंतु उर्वरीत पंचेचाळीस हजार रुपये भरणा केलेला नसल्यामुळे त्यांचेकडील महाराष्ट्र करमणुक शुल्क अधिनियम 1923 चे कलम 5 अंतर्गत दंडाची रक्कम वसूल करणेकामी मौजे शेंदुर्णी येथील मालमत्ता क्रमांक 3129 मालमत्तेची लांबी 37.3 इमारतीचे क्षेत्रफळ 401 चौ.मी. या जागेचे दि. 22/08/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे जाहीर लिलाव करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती किंवा संस्थानी लिलावात भाग घ्यावा. लिलावातील अटी व शर्ती लिलावातील जागा. लिलावातील बोलीहातची किंमत इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसिलदार जामनेर यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन अरूण शेवाळे, तहसिलदार जामनेर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377