सापडलेल्या तीन वर्षीय बालकाच्या पालकाचा शोध सुरू

जळगाव दि. 2- कृष्णा (वय, अंदाजे तीन वर्ष ) बालकाचे आजतागायत आई-वडिल, नातेवाईक भेटीस आलेले नाहीत, बालकाच्या नातेवाईक, पालक यांनी 30 दिवसाच्या आत बाल कल्याण समिती, जळगाव फोन नं 0257-2239851 व जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे बालगृह, निरीक्षण जळगाव 0257-2239851 व जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव फोन (०२५७-२२२८८२५) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी केले आहे.
कृष्णा (वय, अंदाजे तीन वर्ष ) हा बालक 8 जुलै, 2022 रोजी रावसाहेब पाटील यांच्या नाष्टा सेंटर, शिवकॉलनी जवळ, गणेश कॉलनी येथे गेले 3 दिवसांपासून एकटाच पालकाविना दिसला. त्याला त्याच्या आईचे नाव विचारले तर तो कमला, वडिलांचे नाव संतोष सांगत आहे. या बालकास अपंग कुष्टरोगी स्वावलंबन संस्था संचलित, शिशुगृह जि धुळे 72, उत्कर्ष कॉलनी साक्री रोड, जि. धुळे येथे दाखल केले आहे, असेही त्यांनी कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



