तृतीयपंथीयांना ऑनलाइन ओळखपत्र, प्रमाणपत्राचे वाटप
जळगाव दि.19 – सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तृतीयपंथीयांना ऑनलाईन ओळखपत्र व प्रमाणपत्र वाटप व योजनेविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम तहसील कार्यालय, चाळीसगाव येथे नुकताच पार पडला.
तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार संदेश निकुंभ, पुरवठा निरीक्षण अधिकारी आर. आर. ढोले, संजय गांधी निराधार योजनेचे संजय पाटील, पुरवठा निरीक्षक एन. एम. जाधव, सुशांत अहिरे, तृतीयपंथी यांचे प्रतिनिधी फिझा शहा आदी उपस्थित होते.
श्री. पगारे यांनी राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांचा हक्कांच्या संरक्षणासाठी केंद्र शासन तृतीयपंथी व्यक्तीचे हक्काचे संरक्षण कायदा अधिनियम 2019 पारित केला असून याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथीय समाजाच्या समस्या, तक्रारी निवारण संदर्भात जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. समाज कल्याण विभागाकडून तृतीयपंथीयांना “NATIONAL PORATAL FOR TRANGENDER PERSONS” या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन ओळखपत्र व प्रमाणपत्र करून घेण्याबाबतही त्यांनी माहिती दिली. तृतीयपंथीयांच्या शंका, समस्या यांचे निरसनही पगारे, माळी व पाटील यांनी केले.
तहसीलदार अमोल मोरे यांच्या हस्ते चार तृतीयपंथीयांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आभार समतादूत जयश्री चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या माध्यमातून उर्वरित जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना शासनाच्या https://transgender.dosje.gov.in या वेबसाईटवर तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन केल. तृतीयपंथी व्यक्तीचे आधार कार्ड, मतदान कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, नावात बदल केला असेल तर शासनाचे गॅझेट व एफीडेव्हीट सादर करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी नोंदणी करावी. अडचणी आल्यास सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदिर समोर महाबळ रोड, जळगाव येथे संपर्क (0257-2263328-29) करावा, असे आवाहनही सहाय्य्क आयुक्त, समाज कल्याण यांनी यावेळी केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377