पाचोरा येथे उद्या कावड यात्रा

पाचोरा,दि ६- शहरातील शिवभक्तांना तर्फे श्रावण मास निमित्त महादेवाच्या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार, दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी, सकाळी ७ वाजता बांबरुड (महादेवाचे) येथील त्रिवेणी संगमावरुन यात्रा प्रारंभ होईल. बांबरुड ते पाचोरा सवाद्य पायी निघणाऱ्या या कावड यात्रेचे पाचोरा शहरात आगमन झाल्यावर शहरातील जामनेर रोडवरील पांचाळेश्वर महादेव मंदिरात त्रिवेणी संगमावरील पवित्र पाण्याने येथील पांचाळेश्वर महादेवाला जलाभिषेक करण्यात येईल. यानिमित्ताने विशेष पूजा आयोजित करण्यात आली आहे जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या कावड यात्रेत व जलाभिषेक सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम मंदिर सेवा समितीचे किशोर संचेती, अनुप अग्रवाल, सुमित शर्मा, विराज माथुरवैश्य, सुनील सोनार व गोटू गोहिल यांनी केले आहे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



