आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते पुरस्कारार्थी डॉ. यशवंत पाटील यांचा सत्कार
पाचोरा दि.१९:- वार्ताहर: खडकदेवळा बु||. येथील डॉ. वाय. पी. युवा फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटील यांना दिल्ली येथे नूकताच 12 ऑगस्ट रोजी सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल यंदाचा नॅशनल एक्सीलन्स 2022 पुरस्कार केंद्रीय अवजड उद्योग व कौशल्य विकास मंत्री श्री. महेंद्रनाथ पांडेय, सामाजिक न्याय विकास व सक्षमीकरण मंत्री श्री . रामदास आठवलें, मिझोरम चे माजी राज्यपाल श्री. अमोलक रतन कोहली, दिल्ली प्रशासनाचे पर्यावरण मंत्री जाकीर खान, राष्ट्रीय युवा पुरस्कार फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. जावीद जमादार, सेक्रेटरी डॉ. मनिष गवई, तसेच सुप्रसिद्ध कवि, लेखक, साहित्यकार, व्याख्याते, प्रकाशक, संपादक, राष्ट्रीय-अंतराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्री. क्रांति महाजन सर या मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
फक्त जळगाव जिल्ह्यातून पाचोरा येथील डॉ यशवंत पाटील यांची सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल दिल्ली येथील निवड समितीने पत्र पाठवून त्यांची पुरस्कारासाठी निवड केली होती.
या निमित्ताने पाचोरा-भडगाव मतदारसंघांचे विद्यमान आमदार साहेब श्री. किशोर आप्पा पाटील यांनी व त्यांचे पी. ए. श्री. सुधीर पाटील यांनी आमदार कार्यालयात डॉ. यशवंत पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी फाउंडेशनचे विश्वास पाटील, संजयजी निकम, देवचंद गायकवाड, खडकदेवळा येथील सेक्रेटरी जगदिश पाटील, सारोळा येथील मा. सरपंच विकास तात्या पाटील, आमदार साहेबांचे पी. ए. श्री. सुधीर पाटील, व असंख्य ज्येष्ठ नागरिक व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होता.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377