पाचोरा येथे स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान चित्रफित प्रकाशन श्री.शेठ एम.एम.कॉलेज व अग्रवाल समाजाचा स्तुत्य उपक्रम
पाचोरा – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर व तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी 1942 चलेजावच्या चळवळीतील सहभाग आणि त्यातून झालेला गोळीबार व त्यात स्वातंत्र्य सैनिकांना आलेले हुतात्मे यांचा सर्वांनी आढावा घेणार्या पाचोरा स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान या चित्रफितीचे स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार तथा पाचोरा सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते चित्रफितीचे रिमोटचे कळ दाबून प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन अग्रवाल उपस्थित होते. तर त्यांच्या समवेत व्यासपिठावर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजयनाना वाघ, व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही.टी.जोशी, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस निरीक्षक जितेंद्र भोईटे, मुकुंदआण्णा बिल्दीकर, सतिष उर्फ भोलाआप्पा चौधरी, माजी प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील, मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर, पाचोरा तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष सचिनदादा सोमवंशी आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी खुशी पटवारी व यस्वी अग्रवाल यांनी देशभक्तीपर गित सादर केले. तर मान्यवरांच्या हस्ते अग्रसेन महाराज व भारतमाता प्रतिमापुजन करून कार्यक्रम सुरू झाला. अग्रवाल समाज व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व श्री.एम.एम.कॉलेज यांच्या वतीने तयार करण्यात आलेली पाचोरा स्वातंत्र्य सैनिकांचा स्वातंत्र्य लढ्यातील कार्य व हुतात्मे यांचा अभ्यासपूर्ण आढावा घेणारी चित्रफित तयार केल्याबद्दल ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन व त्यांचे सहकारी सागर शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर पाचोरा शहराच्या इतिहासात प्रथमच स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार असलेल्या कुटूंबियांपावेतो अग्रवाल समाज मंडळ यांचे पदाधिकारी निमंत्रण देण्यासाठी पोहोचल्याने मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य सैनिकांचे कुटूंब देखिल कार्यक्रमास उपस्थित होते. या सर्व कुटूंबियांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांनी सदरचे चित्रफित पाहून स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची माहिती पाचोरेकर्यांना सविस्तरपणे प्रथमच बघायला मिळाल्यामुळे उपस्थितीतांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाला प्रतिसाद देत देशभक्तीपर घोषणा देवून साद व दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप महाजन यांनी केले. तर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, संस्थेचे चेअरमन संजयनाना वाघ, तहसिलदार कैलास चावडे हे मान्यवर आपले मनोगत व्यक्त करतांना भारावून गेले होते. सदरची डॉक्युमेंट्री करिता माजी प्राचार्य बापु साहेब डॉ. बी एन पाटील प्राचार्य डॉ वासुदेव वले, डॉॅ. जे. व्ही. पाटील, श्री.गोसे हायस्कूलच्या उप शिक्षिका सौ.शितल संदीप महाजन सागर DJ ग्रुप , जामनेर येथील VDO एडीटर केदार पाटील अतुल चित्ते मनोज बडगुजर प्रवीण दुसाने यांचे अनमोल सहकार्य लाभले यशस्वीतेसाठी अग्रवाल समाज मंडळाचे सिताराम अग्रवाल, अनुप अग्रवाल, दिनेश अग्रवाल, राजेश मोर, लक्ष्मीकांत पटवारी, संजय पटवारी, गोपाल पटवारी, राजेश पटवारी, संजय सावा, रमेश अग्रवाल, पवन अग्रवाल, युवा मंच अध्यक्ष निखिल मोर, रवि मोर, किशन मोर, लौकिक अग्रवाल, अंकित अग्रवाल, योगेश अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, अजय गिंदोडिया, जितू मोर, नितेश अग्रवाल, राहूल गिंदोडिया, मुकेश अग्रवाल, सौरव सावा, पप्पू मोर, चिंटू पटवारी, अनुराग भारतीया, महिला अध्यक्षा संगिता अग्रवाल, किरण पटवारी, सुशिला अग्रवाल, माया पटवारी, बबिता मोर, शितल निमोदिया, कृष्णा गिंदोडीया, बहूमंडल अध्यक्षा टिना अग्रवाल, मोनिका पटवारी, पल्लवी मोर,श्वेता अग्रवाल, मेघा मोर, संगिता अग्रवाल, लिना अग्रवाल यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काकाश्री प्रा.सी.एन.चौधरी यांनी तर आभार सिताराम अग्रवाल यांनी मानले. राष्ट्रगिताच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377