माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव,दि.१७ – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि वैयक्तिक पातळीवर घरगुती गेणेशोत्सवासाठी “ माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार ” ही स्पर्धा ३१ ऑगस्ट २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
स्पर्धेची नियमावली https://ceo.maharashtra.gov. in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच स्पर्धकांनी ३१ ऑगस्ट २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत http://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गूगल अर्जावरील माहिती भरुन आपल्या देखावा – सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे. तसेच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांना प्रचार साहित्य मंडपामध्ये अनिवार्यपणे लावणे बंधनकारक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – प्रथम क्रमांक – ५१,०००, द्वितीय क्रमांक २१.०००/-, तृतीय क्रमांक – ११,०००/- उत्तेजनार्थ – ५,०००/- (एकूण दहा बक्षिसे), घरगुती गणेशोत्सव सजावट प्रथम क्रमांक – ११,०००/- द्वितीय क्रमांक ७,०००, तृतीय क्रमांक ५,००० उत्तेजनार्थ – ५,०००/- उत्तेजनार्थ १,०००/- (एकूण दहा बक्षिसे), असे बक्षीसांचे स्वरुप आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377