आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोरा लालबाग राजा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे विविध स्पर्धेंचे आयोजन

पाचोरा दि.2– मागील दोन वर्षा पासून कोरोना साथिनी संपूर्ण जगाला हैरान करून सोडले होते अनेकांनाचा यात मृत्यु झालेला असून आजही याची झळ सबंध जग सोसत आहे  सध्या या साथिचा प्रभाव जरी कमी झाला असला तरी ति पूर्ण पने आटोक्यात आली असे नाही. परंतु आज निर्बंध पूर्णपने शिथिल झालेले आहेत. सर्व सन उत्साहाने साजरे केले जात आहेत. यातच गणेशोत्सव आलेला असल्याने अनेक गणेश भक्तांचे चेहरे प्रफुल्लीत पहावयास मिळताय.तसेच अनेक ठिकाणी नव नविन डेकोरेशन, पर्यावरण पूरक संदेश  आरास सजावटीतुन दिले जात आहेत शिवाय सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर ,मनोरंजनात्मक  आदी कार्यक्रम देखिल आयोजित केले जात आहते  

पाचोरा लालबाग राजा चॅरिटेबल ट्रस्ट, भडगाव रोड,पाचोरा येथे देखिल अनेक विविध कार्यक्रम सदर मंडळाने आयोजित केले आहेत तरी नागरिकांनी या मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविन्याचे आवाहन मंडळा तर्फे करण्यात आलेले आहे .सदर स्पर्धेचे नियोजित वेळापत्रक व स्पर्धेची माहिती पुढील प्रमाने आयोजकांनी कळविली आहे.

गणपती उत्सव स्पर्धा – २०२२

फॅन्सी ड्रेस

दिनांक. ०३.०९.२०२२ वेळ : संध्या: ५ वाजता

१. गट १ ली ते ४ थी  व  ५ वी ते ९ वी

२. स्पर्धकांना काही बँग्राऊंड साऊंड लागल्यास पेन ड्राईव्ह किंवा मोबाईल मध्ये सोबत आणावे.

३. स्पर्धकांना प्रत्येकी जास्तीत जास्त २ मिनीटांची वेळ देण्यात येईल.

रांगोळी

दिनांक. ०४.०९.२०२२ वेळ : सकाळी ११ वाजता

१. वयोमर्यादा नाही

२. रांगोळी संस्कार भारतीच असावी दुसरी पात्र धरली जाणार नाही.

३. रांगोळी व रंग स्वतः स्पर्धकाने आणावेत.

४. रांगोळी दिलेल्या जागेतच काढावी लागेल.

५. स्पर्धेकाने प्रत्येकी जास्तीत जास्त ५० मिनीटांची वेळ देण्यात येईल.

निबंध स्पर्धा

दिनांक.०४.०९.२०२२ वेळ : सकाळी ११.३० वाजता )

१. गट १ ली ते ४ थी व ५ वी ते ९ वी

२. निबंध ७५ व्या स्वातंत्र महोत्सवावर करायचे आहे.

३. पेपर पेन व पॅड सोबत आणावे.

४. स्पर्धकांना प्रत्येकी जास्तीत जास्त ५० मिनीटांची वेळ देण्यात येईल.

डान्स ता. ०४.०९.२०२२ वेळ : संध्या ५ वाजता

१. गट १ ली ते ४ थी व ५ वी ते ९ वी

२. स्पर्धेकाने आपले गाणे पेन ड्राईव्ह किंवा मोबाईल मध्ये

सोबत आणावे.

३. स्पर्धेकांना प्रत्येकी जास्तीत जास्त २ मिनीटांची वेळ देण्यात येईल.

 मेहंदी ता. ०४.०९.२०२२ वेळ : सकाळी १० वाजता )

१. वयोमर्यादा नाही

२. मेहंदी स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या एका हातावर काढता येईल.

३. मेहंदी ज्याच्या हातावर काढणार आहात असे एक जण स्पर्धकाने सोबत आणावा.

४. जे तुमच्या सोबत येतीत ते तुम्हास कोणत्याही प्रकारे मदत करु शकणार नाहीत.

५. स्पर्धेकाने प्रत्येकी जास्तीत जास्त ५० मिनीटांची वेळ देण्यात येईल.

ड्राईंग (रंगभरण)  ता. ०४.०९.२०२२ वेळ : सकाळी १०.३० वाजता

१. गट १ ली ते ४ थी व ५ वी ते ९ वी

२. स्पर्धकांना चित्र देण्यात येईल त्यात त्यांना रंग भरायचे आहे.

३. स्पर्धकांनी लागणारे रंग व ई. सर्व साहित्य स्वतः आणावेत

४. स्पर्धकांना प्रत्येकी जास्तीत जास्त ५० मिनीटांची वेळ देण्यात येईल.

 जनरल नॉलेज  ता. ०४.०९.२०२२ वेळ : सकाळी १२.३० वाजता

१. गट १ ली ते ४ थी व ५ वी ते ९ वी

२. वेळेवर पेपर देण्यात येईल.

३. पेपर पेन व पॅड सोबत आणावे.

४. स्पर्धकांना प्रत्येकी जास्तीत जास्त ५०मिनीटांची वेळ देण्यात येईल.

    सर्व स्पर्धासाठी नियम व अटी

१. सर्व स्पर्धेत पहिल्या ५१ स्पर्धकांना प्रवेश देण्यात येईल.

२. सर्व स्पर्धांची नोंदणी फी ५१ रुपये

३. स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य स्पर्धकाने स्वत: आणावेत.

४. सर्व स्पर्धामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ २ यांना ट्रॉफी व प्रत्येकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

५. स्पर्धाबद्दल सर्व बाबतीत अंतिम निर्णय आयोजकांचे राहतील

.

.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!