पाचोऱ्यातील मुस्लिम बांधवाने गणपती आरती करून दिला सामाजिक एकतेचा संदेश!

पाचोरा,दि.3- लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक एकामत्मतेची, देशभक्तीची भावना वाढीस लागुन त्यामाध्यमातुन सर्वांना एकत्र येण्याचे व्यासपिठ मिळावे. यासाठी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्यातुन आज सर्वत्र गणेशोत्सव विविध उपक्रमांव्दारे साजरा होत आहे. विविध धर्माच्या एकात्मतेच्या संदेशाचे पालन करत पाचोरा शहरातील भुयारीचा राजा या गणेश मंडळाच्या मुस्लिम समाजातील व्यवासायिक फारुख शहा यांनी गणेशमुर्तीची आरती करुन शहरातील मंडळांना सामाजिक एकतेचा संदेश दिला.
पाचोरा शहरातील एस बी कॉम्प्लेक्सच्या “भुयारीचा राजा” या गणपतीची आजची आरती एका मुस्लिम व्यक्तीच्या हस्ते पार पडली. श्री गणेशाच्या आजच्या आरतीचा मान एका मुस्लिम व्यक्तीला देऊन पाचोऱ्यात हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडले.
याबाबत आपली भावना व्यक्त करताना फारूक शहा असे म्हणाले की, माझ्यासाठी लहानपणापासून गणेशोत्सव हा आनंदाचा क्षण राहिला आहे. धर्माने मुस्लिम असलो, तरी माझ्या घरी मला माझ्या आई वडिलांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिली. भुयारीचा राजा या मंडळाचे हे चोथे वर्ष असून हे मंडळ प्रत्येक वर्षी समाज उपयोगी कार्य करतात व महाप्रसादाचे आयोजन करीत असतात. यां मंडळात शरद वाघ, पत्रकार दिलीप परदेशी, पवन प्रजापत, योगेश सोनवणे, पडोळकर दादा, फारुख शहा रवींद्र पाटील, संदीप परदेशी, योगेश पाटील, गणेश रावलं, भावेश राजपूत, महेश पाटील, मानव गायकवाड, निलेश कोळी, मनोज सैंदाणे हे आरती साठी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



