जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहिम

जळगाव,दि. 27– शैक्षणिक तसेच त्रुटीपुर्तते अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 27 आणि 28 सप्टेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या दिवशी सकाळी 10 ते 6 पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर जळगाव या ठिकाणी ज्यांना ऑनलाईन, ई – मेलव्दारे त्रुटी कळविण्यात आली आहे, अशा उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सह सदर दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
तसेच दक्षता पथक व सुनावणीसाठी प्रलंबित अर्जदारांना स्वतंत्ररीत्या संपर्क साधण्यात येईल. या कालावधीमध्ये आवश्यक ती पुर्तता करुन घेणे ही अर्जदाराची जबाबदारी राहील. या कालावधीमध्ये त्रुट/पुर्तता आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यास होणाऱ्या नुकसानीस अर्जदार स्वता जबाबदार राहील, याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



