अमन मित्तल यांनी स्विकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

जळगांव :- भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2015 च्या तुकडीतील अमन मित्तल यांनी आज जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. श्री मित्तल हे इंजिनिअर असून चंद्रपूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केला. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वैशिष्टयपूर्ण कार्य केले. 2021 पासून आजवर त्यांनी लातूर महानगर पालिकेत आयुक्त म्हणून आपल्या अभ्यासपूर्ण कारकीर्दीचा ठसा उमटविला आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



