जळगाव एलसीबी पीआय बकालेला अटक व सेवाबडतर्फी साठी मराठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

पाचोरा – जळगाव येथील एलसीबी पीआय किरणकुमार
बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मराठा समाजा मध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. कुठल्याही समाजाच्या माता-भगिनी विषयी अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे महाराष्ट्रीयन संस्कृतीला धरून नसून अशा वृत्तीच्या लोकांना समज मिळावी शिवाय यापुढे सर्व धर्म ,जाती मधील स्त्रियांचा आदर राखला गेला पाहिजे यासाठी दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजातर्फे सकाळी 11 वाजेला मोर्चा प्रारंभ होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर असंख्य मराठा बांधव व भगिनी तसेच इतर समाजातील बंधू भगिनी यांनीही पाठिंबा दर्शवत या मोर्चात सहभाग होण्याचे कळविले आहे.
हा मोर्चा एका व्यक्तीला विरोध नसून या व्यक्ती आड लपलेल्या समाज विघातक प्रवृत्तींना धडा शिकविणे असून अशा लोकांना पाठीशी घालणाऱ्यांनाही हा गर्भित इशारा असेल.बकाले विरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याची चौकशी सुरू आहे परंतु त्याला अटक अजूनही झालेली नाही.त्याचा अट्टपूर्वक जामीन फेटाळाला असल्यावरही तो अजून पोलिसांना मिळून येत नाही.ही बाब म्हणजे सदर व्यक्तीला राजकीय पाठिंबा तर मिळत नाही अशी शंका उपस्थित होत आहे.पाचोरा येथील सभेत वि.प नेते मा.अजित पवार यांनीही सदर व्यक्तीस बडतर्फ करावे ही भुमिका मांडली होती व तसे पत्र ही मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.तरी बकालेनी केलेल्या आक्षेपार्ह विधाना संदर्भात कारवाई झाली नाही तर अधिकारी जबाबदार असतील याचीही जाणीव असावी. सदर आरोपी मोकाट असल्याने पुरावे नष्ट करण्याची शक्यता असू शकते शिवाय समाजात तीव्र असंतोषाची भावना निर्माण होत असून आंदोलन यापुढे अजून तीव्र केले जाऊ शकते, तरी वेळीच सदर व्यक्तीस अटक व सेवेतून बडतर्फ करावे ही मागणी सकल मराठा समाजा तर्फे केली जात आहे.
पाचोरा येथील विश्रामगृहावरील बैठकीमध्ये अशोक शिंदे ,रोशन मराठे , हरिभाऊ पाटील यांनी आपले विचार व्यक्त करीत सदर मोर्चासाठी जळगाव येथे दिनांक 30 रोजी मोठ्या संख्येने मराठा बांधव व भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले यावेळी पी. एस.पाटील, एस डी थोरात ,किरण बोरसे,राजेंद्र पाटील, जयदेव पाटील,अनिल मराठे, अंकुश ठाकरे ,मनोज पाटील यांचे सह असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



