पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी सुरू पात्र, पदवीधरांनी 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत-विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक,दि.30 – भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी येत्या एक ऑक्टोबरपासून सुरु होणार असून 7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरून देता येणार आहे. पदवी परीक्षा 1 नोव्हेंबर, 2022 पूर्वी उत्तीर्ण झालेल्या सर्व पदवीधरांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे. याकरीता विहीत नमुन्यातील फॉर्म क्र. 18 भरून द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.
मतदार नोंदणी अर्ज नमुना 18 स्वीकारण्यासाठी कक्षाची स्थापन
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारास आपला आधार क्रमांक मतदार नोंदणी अर्जात नमूद करता येईल. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे ऐच्छिक आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात व विभागीय आयुक्त कार्यालयात मतदार नोंदणी अर्ज नमुना 18 स्वीकारण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. याच कार्यालयातून नमुना 18 उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही श्री गमे यांनी सांगितले.
पात्र नागरिकांनी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, बँका इ. कार्यालयातील कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या पात्र पदवीधर अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून फॉर्म नं. 18 भरुन घ्यावेत व आवश्यक कागदपत्रासह साक्षांकन करुन संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय या ठिकाणी जमा करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त नाशिक तथा नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी, श्री गमे यांचेकडून करण्यात आले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



