ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबीत मागण्या मंजुर करणे साठी पंचायत समिती समोर एक दिवसीय लाक्षणीक उपोषण
पाचोरा,दि.५ – येथील पंचायत समिती समोर महात्मा गांधी जयंतीचे निमित्त दि ३ ऑक्टो.रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एक दिवसीय लक्षणिक उपोषण,चिंतन बैठक व धरणे आंदोलन पंचायत समिती समोर करण्यात आले. ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागन्यांनसाठी हे उपोषण केले गेले.राज्यात ग्रामरोजगार सेवक १५ वर्षापासुन प्रमाणिकपणे मनरेगाची सर्व कामे करीत असतांना त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी कधीच वेळेवर मानधन,प्रवास भत्ता, अल्पोपहार,२०१९ चा वार्षिक प्रोत्साहन भत्ता,सादील खर्च मिळाला नाही. अनेक वेळा निवेदने देऊनही कसल्याही प्रकारची नोंद घेण्यात आली नाही.आजमितीस ग्रामरोजगार सेवक निराशेच्या संकटात सापडलेला दिसत आहे.
राज्यात महात्मागांधी मनरेगा माध्यमातुन २६४ योजना राबवणाऱ्या व ग्रामपातळीवर सारखा दिवसभर कामावर राबवुन तसेच वैयक्तीक लाभाच्या योजना यावर कामे करून ग्रामरोजगार सेवक आपले मजुरीचे कामे करीत असतो.आज मजुरांच्या हाताला नियमित काम असावे कारण त्यांचे स्वतः संसाराचा गाडा चालवण्यास आज ते असमर्थ ठरत आहे. तेव्हा शासन व प्रशासनाने मनरेगाच्या माध्यमातुन राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी मनरेगा योजनेच्या मुख्य कना असणाऱ्या ग्रामरोजगार सेवकाला न्याय देण्याची कृपा करावी अशी आर्त हाक या वेळी शासन दरबारी पोहचावी व मागणी केलेल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी तहसीलदार कैलास चावडे व प.समिती येथे संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन उपशोण केले त्यांना पाचोरा तालुका ग्रामसेवक संघटनेचा पाठिंबा मिळाला
मागण्या या प्रमाणे
१) ग्रामरोजगार सेवकांची आकृतीबंद समायोजन करुन शासकी सेवेत समाविष्ट करावे. २) किमान वेतन कायदे अंतर्गत ठराविक मासिक वेतन देण्यात यावे. ३ )वैयक्तीक खात्यात मानधन जमा करावे. ४) एन.एम.एम.एस.अंतर्गत हजेरी घेण्याचे बंधनकाकर असल्यास अॅन्ड्राईड मोबाईल व दर महा नेट पॅक प्रदान करावा.कामाच्या ठिकाणी नेटवर्क नसल्यास ऑफलाईन हजेरी मान्य करावी. ५) ग्रामरोजगार सेवकाला विमा संरक्षण प्रदान करण्यात यावे. ६) ग्रामरोजगार सेवकाचे प्रलंबीत देयके त्वरीत देण्यात यावी.
सदर मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अशी मागणी शासन व प्रशासनास यावेळी करण्यात आली.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377