मुंबई, दि. २८ :- ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, राज्यात एकूण ७०.१३ टक्के निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे. त्या विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालकांनी केले आहे.
सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा ग्रंथालय संचालनालयामार्फत घेण्यात येते. या परीक्षेची गुणपत्रिका www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १४ नोव्हेंबरनंतर मिळणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे, त्यांनी प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी १० रूपये याप्रमाणे शुल्क व अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाठवावेत. यानंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाही, असे ग्रंथालय संचालकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377