आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोर्‍यात साजरी होत आहे अनाथांची दिवाळी अनाथ,निराधार बालकांनाआश्रमात येण्याचे आवाहन.



पाचोरा- आपल्या पाचोरा शहरात अनाथांचे मायबाप म्हनवले जाणारे ह. भ. प .योगेश महाराज. धामणगावकर व ह. भ .प. सुनीताताई पाटील. यांच्याकडे गेल्या चार वर्षापासून अनाथ मुलं आहेत आणि ते त्यांना सांभाळत आहे गेले तीन वर्ष हे कार्य एका भाड्याच्या घरात चालू होते परंतु यावर्षी या मुलांची दिवाळी खूप वेगळ्या उत्साहात साजरी झाली. त्याला कारण म्हणजे पाचोरा शहरातील दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय रमेश जी मोर .यांच्या सहकार्याने उभे राहिलेले लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे वारकरी भवन येथे मुलांची दिवाळी साजरी झाली .गावातील अनेक दान शूर दात्यांनी मुलांना फराळ असो फटाके असो यासाठी सहकार्य केले आणि मुलांची दिवाळी गोड झाली.
या अनाथ मुलांसोबत अजूनही काही मुले शिक्षण घेत आहे जवळ जवळ 50 पेक्षा जास्त मुलं या वारकरी भवन मध्ये निवासाला आहेत त्यांना दररोज गीता पाठ हनुमान चालीसा रामरक्षा स्तोत्र हरिपाठ काकड आरती पखवाज वादन हार्मोनियम तसेच गायनाचे प्रशिक्षण दिले जाते .आणि आपल्या शालेय वेळामध्ये ही मुलं शाळेत देखील जातात.
श्री योगेश महाराज आणि ताई नेहमी म्हणत असतात की एक उत्कृष्ट जाणता नागरिक निर्माण होण्यासाठी त्याला शिक्षणासह अध्यात्माची जोड सुद्धा असणे गरजेचे आहे शालेय शिक्षणासह आध्यात्मिक शिक्षणाची व्यवस्था या वारकरी भवन मध्ये आहे या मुलांचा सर्व खर्च महाराज आणि ताई यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमातून येणारा पैसा यावर केला जातो किंवा काही दानशूर दात्यांचा येणाऱ्या मदतीचा ओघ यातून खर्च पूर्ण केला जातो तसेच अलीकडे काही सुजाण नागरिक आपला वाढदिवस लग्नाच्या वाढदिवस वडिलांची पुण्यतिथी हे संस्थेमध्ये साजरा करून अनाथ मुलांचा दिवस गोड करत असतात .
या वारकरी भवन तर्फे अजूनही आवाहन करण्यात आले आहे की तालुक्यात परिसरात कोठेही अनाथ मुले असते या मुलांना या वारकरी भवन मध्ये सोडून द्यावे या मुलांची सर्व जबाबदारी वारकरी भवन मार्फत घेण्यात येईल आणि आपण सुद्धा सर्वांनी एक वेळ अवश्य या वारकरी भवनला भेट द्यावी.

बातमी लाईक करा शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क
Z4 NEWS,
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\