शिवाजी शिंदे सरांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान
पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक मीठाबाई कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री शिवाजी शिंदे सर यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दि 30 ऑक्टोबर 2022 रोजी यात्रा यड्रवकर सभागृह जयसिंगपूर- कोल्हापूर येथे सेवानिवृत्त ब्रिगेडियर तथा माजी खासदार सुधीर सावंत, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक हा पुरस्कार देण्यात आला. श्री शिवाजी शिंदे व सौ कुंदा शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र व स्मृतीन्चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याप्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव माजी आमदार उल्हास पाटील (शिरोळ) आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी खडकदेवळा हायस्कूलचे उपशिक्षक श्री चंद्रकांत पाटील, नांद्रा जि. प. प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सीमाताई पाटील, गोराडखेडा जि प शाळेचे मुख्याध्यापक गुणवंतराव पवार आदी स्नेहीजन उपस्थित होते.
विश्वासराव पवार ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशील राजे पवार, गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, पी. टी. सी. शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, तुळजाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब डी.एम. पाटील, विश्वासराव ट्रस्टच्या सचिव श्रीमती रूपाली ताई जाधव- पवार, विश्वस्त प्रमोद गरुड, प्राचार्य संजय पवार, रोटरी क्लब अध्यक्ष डॉक्टर अमोल जाधव यांचे सह अनेक सामाजिक राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377