
भडगाव ता.7:नगरदेवळा सुतगिरणी जवळ प्रस्तावित एमआयडीसी निर्मितीच्या हालचालीना वेग आला असुन आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्यानी जागेची पाहणी करत 31 नोव्हेंबर पर्यंत 110 हेक्टरच जमीनी मुल्यांकनाची प्रक्रीया पुर्ण करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना यंत्रणेला देण्यात आल्या. तर पुढच्या सहा महीन्यात प्रत्यक्षात औद्योगिक वसाहतीच्या विकासाला सुरवात होईल असे सुतोवाच आमदार कीशोर पाटील यांनी दिले.
गेल्या 5-6 वर्षापासून एमआयडीसीचा विषय प्रलंबित आहे. एमआयडीसीला शासनाकडुन मंजुरी मिळाली आहे. मात्र आवश्यक जमीन अधिग्रहनाची प्रक्रीया रखडल्याने आम जनतेकडुन शंका उपस्थती होत होत्या. पण आता एमआयडीसाठी जमीनी अधिग्रहणाची प्रक्रीया अंतिम टप्पात आली असून आता लवरकच प्रत्यक्षात मृत स्वरूप मिळणार आहे.
अधिकार्यानी केली जागेची पाहणी
आज सकाळी दहाला एमआयडीसीच्या अधिकार्यानी नगरदेवळा सुतगिरणी जवळील जागेची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल,उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ श्रीमती सोनाली मुळे, मंबई,प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, उप अभियंता आर. एन. पांडुळे,एरिया मॅनेजर वासुदेव सपकाळे, मुख्य सर्वेअर आर. डी. बकरे, विपीन पाटील, सहाय्यक अभियंता,पाचोरा रजिस्टार रामदास पाटील, भडगाव रजिस्ट्रार व्ही.ए. वाडेकर, तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, भडगाव तालूका प्रमुख संजय पाटोल,माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, भडगावचे डॉ विलास पाटील, प्रविण ब्राह्मणे, आमदारांचे स्विय सहाय्यक राजेश पाटील, वाकचे स्वप्नील पाटील, बोदर्डेचे रविंद्र पाटील, योगेश पाटील आदि उपस्थित होते.
पहील्या टप्प्यात 110 हेक्टरवर होणार एमआयडीसी
सद्य:स्थितीला पहिल्या 110 हेक्टर क्षेत्राची जमीनी अधिग्रहणाची प्रक्रीया करून ती जमीन विकसीत करण्यात येणार आहे. यात 65 एकर जमीन ही निंभोरा व कनाशी ग्रामपंचायतीची गावठाण, 22 हेक्टर नगरदेवळा सुतगीरणीची तर 22 हेक्टर खासगी शेतकर्याची जमीन अधिग्रहणास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार 31 नोव्हेंबर पर्यंत या जागाचे मुल्यांकन करून जिल्हाधिकार्यामाफर्त शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना प्राताधिकार्याकडे झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.पहील्या टप्प्यात 110 हेक्ट जमीनी अधिग्रहीत होऊन एमआयडीसी विकसित होण्याची प्रक्रीया सुरू होणार आहे. तर दुसर्या टप्प्यात शेतकर्याची खासगी तब्बल 207 हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहे. म्हणजे एकून 317 हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी उभी राहणार आहे.
प्रातांधिकार्याकडे बैठक

आमदार कीशोर पाटील यांच्या उपस्थितीत आज एमआयडीसीच्या जागेची पाहणी केल्यानंतर लगेच प्रताधिकार्याच्या दालनात यासंदर्भातील सर्व अधिकार्याची एकत्रित बैठक झाली. यात तातडीने जमीन अधिग्रहणाची प्रक्रीया करण्याच्या सुचना करण्यात आल्या. यासाठी कामांची विभागणी ही करण्यात आली. पुढच्या आठ दिवसात जमीनीचे मुल्यांकन काढण्यात येणार आहे. तर 31 नोव्हेंबर पर्यंत जिल्हाधिकार्यामाफर्त हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. तर एमआयडीसीसाठी आवश्यक पाणी गिरणा नदिवरून आणण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय इतर सुविधाबाबत ही यावेळी चर्चा झाली.
भडगाव एमआयडीसीसाठी 110 हेक्टर जमीन अधिग्रहणाची प्रक्रीया अंतिम टप्पात आला असुन 31 नोव्हेंबर पर्यंत जमीनीचे मुल्यांकन होऊन शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. तर पुढच्या सहा महीन्यात प्रत्यक्षात एमआयडीसी च्या विकासाला सुरवात होईल. यामाध्यमातून तरूणांना रोजगार उपलध्द करून देण्यावर माझा भर आहे.
-कीशोर पाटील
आमदार :पाचोरा-भडगाव
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



